About Us
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट — विश्वासाचा भक्कम आधारस्तंभ!!
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती सीमित नाही, तर ती ग्रामीण भारताच्या विकासासाठी समर्पित असलेली एक सशक्त चळवळ आहे. विश्वास, सुरक्षितता, स्वयंशिस्त, दिलेला शब्द आणि वेळेची काटेकोरपणे जपवणूक ही तिची मूल्ये आहेत. “सभासदांची पत आणि प्रतिष्ठा वाढवणे” या ब्रँड वचनासोबत संस्था बचत व चालू खात्यांबरोबरच अनेक उपयुक्त सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना लाभ देत आहे.
दरवर्षी ३६५ दिवस, म्हणजेच ४३८० तास अखंड सेवा देणारी ही संस्था इतर बँकांच्या तुलनेत (ज्या वर्षात सरासरी २१०० ते २६०० तास सेवा देतात) अधिक काळ कार्यरत असते. ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारांपुरतीच मर्यादित न राहता, सामाजिक उपक्रम, उद्योजक मंचाच्या माध्यमातून व्यवसायाची दिशा आणि विचारधनाचे संस्कार देत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करते.
आज श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट ही संस्था लाखो कुटुंबांच्या आशा आणि विश्वासाचे प्रतीक ठरली असून, एक जागतिक कीर्तीचा प्रतिष्ठित ब्रँड म्हणून उभी आहे. नागेबाबा कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आर्थिक, मानसिक, शारीरिक, वैचारिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि सामाजिक विकास घडवणे हेच आमचे खरे ध्येय आणि प्रेरणास्थान आहे.
100+
पुरस्कार
7 लाख +
समाधानी सभासद
2100 +कोटी
व्यवसाय
57
कार्यरत शाखा
Best In Banking Practices & Providing Transparent Gold Loan From North Maharashtra
सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेला गोवा येथे रेडिओ ऑरेंज द्वारा मा.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व इनु मजुमदार (Redio orange - CEO) यांच्या हस्ते International Excellence in co-operative sector प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त !