व्यवस्थापना बद्दल

About Image

कोअर टीम (Functional Director)

नागेबाबा संस्थेचा प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवणारे शिलेदार !

आमचा गाभा, आमची ताकद

1. नेतृत्वाची दिशा:
नागोबाबा संस्थेची कोअर टीम ही आमच्या संस्थेच्या मूल्यांना आणि दृष्टिकोनाला दिशा देणारी मुख्य प्रेरक शक्ती आहे. धोरणात्मक निर्णय, दूरदृष्टीपूर्ण योजना आणि प्रत्येक टप्प्यावर असलेली सजगता ही आमच्या टीमची ओळख आहे.
2. नवकल्पनांना प्रोत्साहन:
आमच्या कोअर टीममध्ये प्रत्येक सदस्याच्या कल्पनांना, नवविचारांना आणि सर्जनशीलतेला मान दिला जातो. हीच खुलेपणाची संस्कृती आमच्या संस्थेच्या विकासाला बळकटी देते.
3. आत्मविश्वास आणि पारदर्शकता:
सदस्यांमध्ये पारदर्शक संवाद, विश्वास आणि सहकार्याची भावना जोपासणारी ही टीम, खातेदारांच्या आत्मविश्वासाचे प्रतिक आहे. आम्ही विश्वासू, उत्तरदायी आणि पारदर्शक प्रणालीवर विश्वास ठेवतो.
4. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन:
ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा आणि समाधान हेच आमचे अंतिम ध्येय आहे. आमची कोअर टीम सतत ग्राहकांशी संवाद साधत, त्यांच्या गरजांनुसार सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.
5. व्यावसायिक वातावरणाची निर्मिती:
एक प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करून, कोअर टीम संस्था व कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्टतेचा वारसा जोपासते.

About Image

ADO (एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर)

भागविकास अधिकारी (Area Development Officer) ही नागेबाबा संस्थेतील एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, जी संस्थेच्या क्षेत्रीय विस्तार, सेवा वितरण आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या कार्याला गती देते.
मुख्य जबाबदाऱ्या:

1. क्षेत्रीय नियोजन व अंमलबजावणी:
आपल्या क्षेत्रातील विकासासाठी धोरणात्मक नियोजन करणे आणि संस्थेच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे.
2. स्थानिक पातळीवरील संधी शोधणे:
सामाजिक व आर्थिक गरजा ओळखून त्यानुसार नवीन उपक्रम राबविणे आणि उपयुक्त प्रकल्प तयार करणे.
3. संघटन व संवाद:
स्थानिक लोक, खातेदार, ग्राहक आणि स्वयंसेवकांशी संवाद साधून संस्थेच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.
4. सेवा वितरणाची देखरेख:
संस्थेच्या विविध सेवा, लाभ व योजनांचा लाभ प्रत्येक गरजू पर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे व गुणवत्ता राखणे.
5. अहवाल सादरीकरण आणि विश्लेषण:
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे नियमित अहवाल तयार करणे, विश्लेषण करणे आणि मुख्य कार्यालयाशी समन्वय साधणे.
6. विकास कार्यक्रम आयोजित करणे :
आर्थिक साक्षरता शिबिर, शेतकरी मेळावे तसेच विविध प्रशिक्षण सत्र आयोजित करणे.
नागेबाबा संस्थेतील एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर हे सामाजिक बांधिलकी जपणे, विकासाची दूरदृष्टी आणि कार्यक्षमतेचे एक मूर्तिमंत उदाहरण आहेत.

Testimonial