अध्यक्ष बद्दल

संस्थापक चेअरमन नागेबाबा उद्योग समूह, अहमदनगर

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. अहमदनगर

Customer Review
Customer Review
Customer Review
Customer Review
Customer Review
Customer Review

गोधडीवर झोपणारा, पण मनात दूरदृष्टी असणारा एक ‘लक्ष्मीसेवक’ – श्री. कडूभाऊ काळे!

हे पैसे लोकांनी कवडी-कवडी जमवलेत, घाम गाळून मिळवलेत, ते त्यांचं आयुष्यभराचं कष्टाचं सार आहे. आमच्याकडे विश्वासानं ठेवतात, म्हणून त्यांची राखण करणं, जपणं – हे माझं परम कर्तव्य आहे!" असं मनापासून सांगणारे आहेत ‘नागेबाबा मल्टिस्टेट’चे चेअरमन, श्री. कडूभाऊ काळे.

गावाकडचा साधा माणूस, सरळ आणि पारदर्शक स्वभाव. नाटक नाही, दिखावा नाही, अहंकार तर दूरच, अस्सल माणूसपणानं बोलणारे – पण त्यामागे हजारो लोकांचा विश्वास सांभाळणारा एक जबाबदार सेवक.

आज भाऊंच्या विचाराने दूरदृष्टीने ‘नागेबाबा मल्टिस्टेट’ ही संस्था केवळ एक अर्थसंस्था राहिलेली नाही, तर विचारधन आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक परिवार बनली आहे. संस्थेचा सहभाग अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये आहे – वृक्षमित्र पुरस्कार, गोशाळा(निराधार गोमातांची सेवा), अन्नपूर्णा योजना (ज्याद्वारे अहिल्यानगर शहरातील रुग्णालयांमध्ये गरजू सभासदांना अन्न पुरवले जाते), धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वधर्म समभाव जपणारे उपक्रम हे याचे उत्तम उदाहरण आहेत.

57 हून अधिक शाखा, हजारो कोटींच्या ठेवी, राज्यभर पसरलेली सेवा आणि हजारो कुटुंबांचं आधारस्थान असलेली ही संस्था – आज लाखो लोकांच्या जीवनात आशेचा किरण बनली आहे.

पण या यशाचं श्रेय घेणं कडूभाऊंना मान्य नाही. ते स्पष्टपणे सांगतात – "हे माझं नाही, हे संत नागेबाबांचं काम आहे. मी फक्त सेवक!"

त्यांचा प्रवास एका टपरीतून सुरु होऊन आज भव्य कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत पोहचला. तरीही ते जमिनीशी जोडलेले, गोधडीवर झोपायला कमीपणा न वाटणारे.
‘नागेबाबा ही संस्था नसून आमची आई आहे’ – ही भावना इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. इथं फक्त आर्थिक व्यवहार नाही, तर लोकांच्या सुख-दुःखात भागीदारी आहे, जीवन उजळवण्याची तळमळ आहे.

कडूभाऊ सांगतात, "आजही रोज एक आवाज आतून येतो – जो मला माझं कर्तव्य बजावायला सांगतो. तो म्हणजेच नागेबाबांचा संदेश – ‘बच्चा, लालच में मत आ...’"


विचारधन गॅलरी

समाजकार्य