'अन्नदान हेच श्रेष्ठदान' बधू आणि भगिनींनो, आपल्या जवळपास सहज नजर टाकली तर अनेक स्त्री-पुरुष अन्नापासून वंचित आहेत. अनेकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत काहींची मुले बाहेरगावी आहेत, त्यांना स्वयंपाक करणे शक्य नाही. अनेक लोक नगर शहरात हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येतात त्यांची नगरमध्ये जेवणाची आबाळ होते हे सर्व दृश्य पहावत नाही म्हणून नागेबाबा मल्टीस्टेट एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यात भाग घेत आहे. आपण या सर्वांसाठी एक अभिनव उपक्रम राबवित आहोत. "अन्नपूर्णा डिपॉझिट स्कीम" आपण आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त, मित्राच्या परिवाराच्या वाढदिवसानिमित्त, नेत्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा जे आपले नातेवाईक दिवंगत झाले आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये वीस हजार रुपये दहा वर्षासाठी डिपॉझिट करायचे आहेत या डिपॉझिटला कुठलेही व्याज मिळणार नाही. परंतु त्याबदल्यात अत्यंत गरजू असे लोक शोधून त्यांना जेवणाचा ..डबा घरपोहोच करण्याचे योग्य नियोजन करू याची तुम्हाला खात्री देतो. तर चला आपणही अन्नदानासाठी आपल्या कमाईतील काही रक्कम फिक्स करूया मुदत संपल्यानंतर आपली मूळ रक्कम आपणास परत देण्यात येईल. जास्तीत जास्त सभासदांनी पुण्यकर्म करण्यासाठी सहभागी व्हावे. 'अन्नदाता सुखी भव:'