शेअर करा:

प्रेमाचा डबा

बंधू आणि भगिनींनो ..."अन्नदान हेच श्रेष्ठदान", असे  आपण अनेकदा ऐकतो व म्हणतो. आपल्या जवळपास सहज नजर टाकली तर अनेक स्त्री-पुरुष अन्नापासून वंचित आहेत. नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून जेव्हा यावर अभ्यास केला गेला तेव्हा लक्षात आले कि अनेक लोक ग्रामीण भागातून  नगर शहरात हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येतात त्यांची जेवणाची गैरसोय होते, नाविलाजाने हॉटेल मधील अन्न पेशंटला द्यावे लागते. हे सर्व दृश्य पहावत नाही म्हणून नागेबाबा मल्टिस्टेट एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यात भाग घेत आहे. अनेकांच्या मनामध्ये अन्नदान करण्याची इच्छा असते परंतु  परिस्थितीमुळे अनेकजण मोठा खर्च करू शकत नाही या सर्वांसाठी एक अभिनव उपक्रम राबवित आहोत. यामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त, मित्राच्या परिवाराच्या वाढदिवसानिमित्त, नेत्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा जे आपले नातेवाईक दिवंगत झाले आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनेकजण यामध्ये मदत करत आहेत आपणही मदतीचा हात व आपल्या मोलाचे सहकार्य  यामध्ये देऊ शकता. त्याबदल्यात नागेबाबा परिवार अत्यंत गरजू असे लोक शोधून त्यांना जेवणाचा डबा हॉस्पिटल ला पोहोचकरण्याचे  योग्य नियोजन करतो याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. तर चला आपणही अन्नदानासाठी आपल्या कमाईतील काही रक्कम यामध्ये मदत करूयात. जास्तीत जास्त सभासदांनी पुण्यकर्म करण्यासाठी सहभागी व्हावे...अन्नदाता सुखी भव :

एक टिप्पणी द्या