शेअर करा:

ग्रीन इंडिया

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट चा निसर्ग उपक्रम आपल्या या भारत देशामध्ये झाडांची कत्तल होत आहे त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम निसर्गावर होत आहे अर्थातच पाऊस कमी झालेला आहे. आपले सर्व जीवनमान हे पावसावर अवलंबून आहे. आपला नागेबाबा मल्टिस्टेट एक अभिनव उपक्रम राबवित आहे • ग्रीन डिपॉझिट स्कीम या डिपॉझिट स्कीम मध्ये ज्या खातेदार सभासदांना प्रामाणिकपणे एक झाड लावावे वाटते, वाढावे वाटते, त्याचे संगोपन करावे वाटते, निसर्ग वाढवावा वाटते, राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा वाटतो अशा सभासदांनी नागेबाबा मल्टिस्टेट मध्ये दहा हजार रुपये डिपॉझिट करावयाचे आहे सदर डिपॉझिट पाच वर्षासाठी लॉकिंग असेल या डिपॉझिटला कुठल्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. आपल्या व्याजाच्या बदल्यात संस्था आपल्या नावाने किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाने किंवा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एक सुंदरसे झाड लावेल त्याचे पूर्णपणे पाच वर्ष संगोपन करेल आणि सर्वात महत्वाचे त्या झाडा शेजारी आपल्या नावाचा बोर्ड असेल. तसेच आपल्याला वेळोवेळी ज्या ठिकाणी आपण झाडे लावणार आहोत तेथे आपल्याला बोलावण्यात येईल. अशी सुंदरशी अविस्मरणीय | डिपॉझिट स्कीम आपण राबवत आहोत .

एक टिप्पणी द्या